मुंबई- कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे फुटबॉल विश्वात मानाची समजली जाणारी चॅम्पियन्स लीग स्पर्धा, यंदाच्या वर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेशिवाय युरो चषक, सीरी ए, इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, बुंदेसलिगा आदी फुटबॉल लीग स्पर्धा आधीच रद्द करण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा फटका चार वर्षांतून एकदा खेळवल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेलाही बसला आहे. यावर्षी स्पर्धा जपानमध्ये होणार होती. पण, कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली. आता ही स्पर्धचा २०२१ मध्ये होणार आहे.
फ्रेंच फुटबॉल क्लब मार्सेलीचे माजी अध्यक्ष पेप डायफ यांचे कोरोनामुळे निधन झाले. डायफ ६८ वर्षांचे होते. त्यांनी २००५ ते २००९ पर्यंत क्लबचे अध्यक्षपद भूषवले होते.