महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

नेमारचा सुटकेचा निश्वास..! बलात्काराचे आरोप फिर्यादी महिलेने घेतले मागे - footballer neymar rape news

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार यांच्यावर लावलेले बलात्काराचे आरोप फिर्यादी महिलेने मागे घेतले आहेत. यामुळे नेमारने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

नेमारचा सुटकेचा निश्वास..! बलात्काराचे आरोप फिर्यादी महिलेने घेतले मागे

By

Published : Aug 10, 2019, 2:09 PM IST

साउ पाउलो - ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार यांच्यावर लावलेले बलात्काराचे आरोप फिर्यादी महिलेने मागे घेतले आहेत. यामुळे नेमारने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

मे महिन्यात पॅरिस येथील एका हॉटेलमध्ये नेमारने आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप ब्राझीलचीच मॉडेल नाझिला त्रिनिदादे हिने केला होता. हा आरोप नेमारने फेटाळून लावत जे काही घडले ते दोघांच्या सहमतीने झाले, असे म्हटले होते.

त्यानंतर सरकारी वकिल फ्लॉविया मेरलिनी यांनी, त्या दिवशी चार भिंतींच्या आड काय घडले, हे समजणे अशक्य आहे. याबद्दल आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळेच हे प्रकरण इथेच बंद करावे अशी मागणी न्यायाधिशांकडे केली होती.

हे सर्व घडल्यानंतर, फिर्यादी नाझिला हिने माध्यमांशी बोलताना सांगितले, 'हे प्रेमप्रकरण आहे. मात्र, यात लैंगिक प्रक्रियादरम्यान, हिंसा झाल्याचे मला सिध्द करता आले नाही'.

ABOUT THE AUTHOR

...view details