लुधियाना -सर्व्हिसेस(सेनादल) फुटबॉल संघाने संतोष ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पंजाबला 1-0 ने मात देत विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. या स्पर्धेतील सर्व्हिसेस संघाचे हे सातवे जेतेपद ठरले आहे. उपांत्य फेरीत पंजाबने गोव्याला तर सर्व्हिसेसने कर्नाटकला पराभुत करत अंतिम फेरीत धडक मारली होती .
अंतिम सामन्यात सर्व्हिसेस संघासाठी बिकास थापाने ६१ व्या मिनीटाला एकमेव गोल केला. सर्व्हिसेसचे जोरदार आक्रमण आणि भक्कम बचावासमोर पंजाबच्या संघाला एकही गोल करता आला नाही.