मुंबई - सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगळुरू एफसीने इंडियन सुपर लिगचे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी झालेल्या आयएसलच्या अंतिम सामन्यात राहुल भेकेने ११७ व्या मिनिटाला केलेल्या शानदार गोलमुळे बंगळुरूने एफसी गोवावर १-० ने विजय मिळवला. या विजयासह आयएसलमधील आपले पहिले वहिले जेतेपद मिळवण्याचे स्वप्न बंगळुरू एफसीने पूर्ण केले आहे.
बंगळुरू एफसीने पटकावले इंडियन सुपर लिगचे विजेतेपद
आयएसलमधील आपले पहिले वहिले जेतेपद मिळवण्याचे बंगळुरू एफसीचे स्वप्न पूर्ण
Bengaluru FC
गेल्यावर्षीही बंगळुरूचा संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचला होता. गेल्या सत्रात चेन्नईयान एफसीकडून पराभव स्विकारावा लागल्याने बंगळुरूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र, यावेळी शानदार कामगिरी करत अखेरच्या क्षणी गोल करत बंगळुरूने विजेतेपदावर आपले नाव कोरले.
मुंबई फुटबॉल अरेना मैदानावर खेळल्या गेले या सामन्यात एकमेव गोल करणाऱ्या राहुलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.