महाराष्ट्र

maharashtra

500 सामने खेळणारा जर्मनीचा फुटबॉलपटू निवृत्त!

By

Published : Oct 9, 2019, 8:01 AM IST

शिकागो फायर प्ले ऑफसाठी पात्र ठरलेला नाही. त्यामुळे ओर्लान्डो सिटी विरु्ध झालेला सामना बॅस्टियनचा शेवटचा सामना होता. या सामन्यात ओर्लान्डो सिटीने शिकागो फायर संघाला २-५ ने पछाडले होते. एमएसएल स्पर्धेचा यंदाचा हंगाम ६ ऑक्टोबरला संपणार आहे. 'एक खेळाडू म्हणून निवृत्ती घेताना वाईट वाटत आहे. पण येणाऱ्या आव्हानासाठी मी उत्सुक आहे', असे श्वेनस्टायगरने निवृत्ती घेताना म्हटले.

500 सामने खेळणारा जर्मनीचा फुटबॉलपटू निवृत्त!

शिकागो -जर्मनीच्या फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बॅस्टियन श्वेनस्टायगरने निवृत्तीची घोषणा केली. ३५ वर्षाचा बॅस्टियन मेजर लीग सॉकरच्या (एमएसएल) शेवटी निवृत्ती घेणार आहे. एमएसएलमध्ये बॅस्टियन श्वेनस्टायगरने शिकागो फायर संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.

बॅस्टियन श्वेनस्टायगर

हेही वाचा -सामन्यावेळी मैदानावरच पंचाचा मृत्यू, कसाई ते पंच असा होता प्रवास

शिकागो फायर प्ले ऑफसाठी पात्र ठरलेला नाही. त्यामुळे ओर्लान्डो सिटी विरु्ध झालेला सामना बॅस्टियनचा शेवटचा सामना होता. या सामन्यात ओर्लान्डो सिटीने शिकागो फायर संघाला २-५ ने पछाडले होते. एमएसएल स्पर्धेचा यंदाचा हंगाम ६ ऑक्टोबरला संपणार आहे. 'एक खेळाडू म्हणून निवृत्ती घेताना वाईट वाटत आहे. पण येणाऱ्या आव्हानासाठी मी उत्सुक आहे', असे श्वेनस्टायगरने निवृत्ती घेताना म्हटले.

जर्मन क्लब असलेल्या बायर्न म्युनिकसाठी बॅस्टियनने ५०० सामने खेळले आहेत. २००२ मध्ये त्याने या संघातून पदार्पण केले होते. शिवाय त्याने आठ बुंडेसलीगा, सात डीएफबी-पोकल, एक चॅम्पियन्स लीग, फिफा क्लब वर्ल्ड कप आणि सुपर कप या स्पर्धा जिंकल्या आहेत. २०१४ मध्ये फिफा विश्वकरंडक उंचावणाऱ्या जर्मनी संघामध्ये बॅस्टियनचा समावेश केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details