बार्सिलोना - कर्णधार लियोनेल मेस्सीच्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने एथलेटिक बिल्बाओचा ४-० ने पराभव करत कोपा डेल रे कप जिंकला. बार्सिलोनाचे हे विक्रमी ३१वे जेतेपद ठरले.
बार्सिलोनाचा या हंगामातील हा सर्वात मोठा विजय ठरला. या विजयासह जानेवारी महिन्यात स्पॅनिश सुपर कपमध्ये एथलेटिक बिल्बोओकडून मिळालेल्या पराभवाचा बदला देखील बार्सिलोनाने घेतला.
शनिवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आले. पण दुसऱ्या हाफमध्ये बार्सिलोना संघाचा खेळाडू एंटोनियो ग्रिजमॅन याने ६० व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर पुढील तीन मिनिटातच फ्रेंकी डी जोंगने गोल करत बार्सिलोनाला २-० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मेस्सीने ६८ आणि ७२ व्या मिनिटाला गोल करत संघाला मोठा विजय मिळवून दिला.