पॅरिस -लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यानंतर फ्रान्सचा युवा फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पे फुटबॉल जगात चमक निर्माण करेल, असा विश्वास आर्सेने वेंगर यांनी व्यक्त केला आहे. वेंगर हे फुटबॉल क्लब आर्सेनलचे माजी खेळाडू आहेत.
''मेस्सी-रोनाल्डोनंतर एम्बाप्पे फुटबॉलविश्वात चमक निर्माण करेल'' - Arsene wenger on mbappe news
पोर्तुगालचा रोनाल्डो सध्या 35 वर्षांचा आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी 32 वर्षांचा आहे. वेंगर म्हणाले, ''आम्ही कधीही कठीण परिस्थितीत असे सर्जनशील खेळाडू पाहिले नाहीत. मेस्सी-रोनाल्डो हे खेळाडू आता आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्पात आहेत. पण पुढची पिढी फ्रान्सची असू शकेल. किलियन एम्बाप्पे नवे नेतृत्त्व करू शकेल."
पोर्तुगालचा रोनाल्डो सध्या 35 वर्षांचा आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी 32 वर्षांचा आहे. वेंगर म्हणाले, ''आम्ही कधीही कठीण परिस्थितीत असे सर्जनशील खेळाडू पाहिले नाहीत. मेस्सी-रोनाल्डो हे खेळाडू आता आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्पात आहेत. पण पुढची पिढी फ्रान्सची असू शकेल. किलियन एम्बाप्पे नवे नेतृत्त्व करू शकेल. नेयमारही आहे. इंग्लंडही असू शकते."
वेंगर पुढे म्हणाले, "इंग्लंडला सध्या चांगली संधी आहे. हा संघ युवा पातळीवर चांगली कामगिरी करीत आहे. गॅरेथ साउथगेटबरोबर वर्ल्ड कपमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. मला आशा आहे की ते युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये विजयी दावेदार असतील."