महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

PREMIERE LEAGUE : आर्सेनलने फॉर्मात असलेल्या मॅनचेस्टर युनायटेडला दिला धक्का - रोमुलु लुकाकु

आर्सेनलने फॉर्मात असलेल्या युनायटेडचा २-० अशा फरकाने पराभव केला. विजयासह आर्सेनलने युनायटेडला मागे टाकत गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले.

आर्सेनल ११

By

Published : Mar 11, 2019, 12:29 PM IST

लंडन- प्रीमिअर लीगमध्ये आर्सेनलसमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी मॅनचेस्टर युनायटेडचे तगडे आव्हान होते. आर्सेनलने फॉर्मात असलेल्या युनायटेडचा २-० अशा फरकाने पराभव केला. विजयासह आर्सेनलने युनायटेडला मागे टाकत गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले.

पहिल्या सत्राच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. मॅनचेस्टरला गोल करण्याची संधी आली होती. परंतु, गोल करण्यात ते अपयशी ठरले. आर्सेनलकडून १२ मिनिटाला झाकाने शानदार गोल करत आर्सेनलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर दोन्ही संघांना पहिल्या सत्रात गोल करण्यात अपयश आले. दुसऱया सत्रात ६८ मिनिटाला ऑम्बेयांगने पेनल्टीवर गोल करत आर्सेनलची आघाडी २-० अशी केली. मॅनचेस्टरच्या लुकाकुने गोल करण्याची चांगली संधी वाया दडवली. पराभवामुळे मॅनचेस्टर युनायटेडची गुणतालिकेत पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.

चॅम्पियन्स लीगमध्ये मॅनचेस्टर युनायटेडने चांगली कामगिरी करताना २-० अशी पिछाडी भरुन काढत बलाढ्य पॅरिस सेंट जर्मेनवर ३-१ असा विजय मिळवला होता. आजच्या सामन्यातही मॅनचेस्टरला विजयाची संधी होती. परंतु, संघाला मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात अपयश आल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवामुळे मॅनचेस्टरला चॅम्पियन्स लीगची पात्रता मिळवण्यासाठी पुढील सामन्यांत चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details