तुरीन - चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या युव्हेंटस संघाला अजॅक्सकडून पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवासह चॅम्पियन्स लीगमधील युव्हेंटस आव्हानही संपुष्टात आले आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या लेगमध्ये अजॅक्सने युव्हेंटसचा २-१ असा पराभव करुन उपांत्य फेरी गाठली आहे. पहिल्या लेगमध्ये अजॅक्स आणि युव्हेंटसचा सामना १-१ असे बरोबरीत सुटला होता. मात्र दुसऱ्या लेगमध्ये मोठ्या फरकाने पराभव झाल्याने युव्हेंटसचा चॅम्पियन्स लीगमधील या सत्राचा प्रवास ईथेच संपला आहे.