नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढलेल्या प्रसारामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्व खेळाडू आपापल्या घरात कुटुंबीयासोबत वेळ व्यतीत करत आहेत. काही दिवसांपूर्वी, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याची पत्नी अनुष्का शर्माकडून केस कापून घेतले होते. आता अजून एका दिग्गज खेळाडूने आपल्या ‘हेअर-कटिंग’साठी गर्लफ्रेंडची निवड केली आहे.
विराटनंतर, रोनाल्डोनेही कापले केस... व्हिडिओ व्हायरल - cristiano ronaldo corona haircut news
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया रॉड्रिगेजकडून केस कापून घेतले. इन्स्टाग्राम अकाउंटवरू रोनाल्डोने हा व्हिडिओ शेअर केला. घरी राहा, स्टायलिश राहा. घरी राहा, सुरक्षित राहा, असे रोनाल्डोने आपल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
विराटनंतर, रोनाल्डोनेही कापले केस...व्हिडिओ व्हायरल
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया रॉड्रिगेजकडून केस कापून घेतले. इन्स्टाग्राम अकाउंटवरू रोनाल्डोने हा व्हिडिओ शेअर केला. घरी राहा, स्टायलिश राहा. घरी राहा, सुरक्षित राहा, असे रोनाल्डोने आपल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
इन्स्टाग्रामवर रोनाल्डोचे २१० मिलियन तर ट्विटरवर त्याचे ८३.६ मिलियन चाहते आहेत. रोनाल्डोपूर्वी, बॉलिवूड स्टार अनुष्का तिचा पती विराटची हेअरस्टायलिश बनली होती.