माद्रिद - स्पॅनिश फुटबॉल लीगच्या नव्या हंगामाला या आठवड्याच्या अखेरीस सुरूवात होणार आहे. यंदाचा हा 17वा हंगाम आहे. पण या हंगामात महान खेळाडू लिओनेल मेस्सी या लीगचा भाग नसणार आहे.
मेस्सी स्पॅनिश लीगमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. 2004 नंतर प्रथमच बार्सिलोनाचा संघ पहिल्यांदा मेस्सी शिवाय मैदानात उतरणार आहे. कारण आर्थिक अडचणीमुळे बार्सिलोनाने मेस्सीसोबतचा करार कायम ठेवलेला नाही.
मेस्सी जेव्हा पहिल्यांदा या लीगचा भाग नव्हता, तेव्हा डिएगो सिमियोन, झिनोदीन झिदान आणि लुई एनरिके हे प्रशिक्षक म्हणून नव्हे तर खेळाडू म्हणून खेळत होते. त्यावेळी माद्रिदचा फारवर्ड विनिसियनस ज्यूनियर आणि एटलेटिको माद्रिदचा फॉरवर्ड जोओ फेलिक्स हे केवळ चार वर्षांचे होते.
बार्सिलोनाचा माजी खेळाडू नेमार युवा अवस्थेत प्रवेश करत होता. त्याने ब्राझील क्लब सांतोसच्या युवा संघासाठी आपला पहिला करार केला होता. रियल माद्रिदच्या किलियन एम्बाप्पे त्यावेळी पाच वर्षांचा होता. त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती हा खेळाडू फुटबॉल विश्वात जगभरात प्रसिद्ध होईल.