महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ISLचे तीन खेळाडू निलंबित, 'हे' आहे कारण

या निलंबित खेळाडूंमध्ये एफसी गोव्याच्या सिलिलीन डोंगल आणि ह्यूगो बुमोस आणि नॉर्थईस्ट युनाइटेड एफसीच्या डिफेंडर काई हिरिंग्जचा समावेश आहे. डोंगलला तीन, बुमोसला आणि हिरिंग्जला दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

ISLचे तीन खेळाडू निलंबित, 'हे' आहे कारण

By

Published : Nov 24, 2019, 7:25 PM IST

नवी दिल्ली -गुवाहाटी येथे रविवारी १ नोव्हेंबर रोजी (इंडियन सुपर लीग)आयएसएलमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यादरम्यान, मैदानावरील खराब वर्तनामुळे तीन खेळाडूंना निलंबित केले आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) शिस्त समितीने ही कारवाई केली.

हेही वाचा -भारताचा बांगलादेशवर 'गुलाबी' विजय; मालिकाही जिंकली

या निलंबित खेळाडूंमध्ये एफसी गोव्याच्या सिलिलीन डोंगल आणि ह्यूगो बुमोस आणि नॉर्थईस्ट युनाइटेड एफसीच्या डिफेंडर काई हिरिंग्जचा समावेश आहे. डोंगलला तीन, बुमोसला आणि हिरिंग्जला दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

सिलिलीन डोंगल, ह्यूगो बुमोस, काई हिरिंग्ज

डोंगलने एका सामन्याचे निलंबन पूर्ण केले आहे. तो यापुढे जमशेदपूर एफसी आणि केरळ ब्लास्टर्सशी होणाऱ्या सामन्यात खेळणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details