नवी दिल्ली - जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे खळबळ उडाली आहे. १४५ देशांमध्ये ६००० हून अधिक लोक मरण पावले आहेत. भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे दोन मृत्यूची नोंद झाली असून १०० पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे.
हेही वाचा -कोरोनासंदर्भात रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल
२१ वर्षांचा युवा फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याचे या धोकादायक व्हायरसमुळे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांपैकी गार्सिया हा सर्वात कमी वयाचा फुटबॉलपटू आहे.
फ्रान्सिस्को गार्सिया हा मलागाच्या क्लब एथलेटिको पोर्टाडाच्या कनिष्ठ संघाचा प्रशिक्षक आहे. गार्सियाचा रुग्णालयातच मृत्यू झाला. शिवाय, त्याला कर्करोगानेही ग्रासले होते. 'गार्सियाच्या मृत्यूमुळे आम्ही फार दुःखी आहोत. गार्सिया, आम्ही तुला कधीच विसरणार नाही', असे एथलेटिको पोर्टाडा या क्लबने म्हटले आहे.