मुंबई - झिम्बाब्वे विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान, एक विचित्र घटना पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये स्टंपच्या जवळ फलंदाज किंवा क्षेत्ररक्षक नव्हता, तरीही स्टम्पवरील बेल्स खाली पडल्या. बांगलादेशच्या डावातील 18व्या षटकामध्ये हा प्रकार घडला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नेमकं काय घडलं -
बांगलादेशच्या फलंदाजी दरम्यान, 18व्या षटकात मोहम्मद सैफूद्दीन स्ट्राइकवर फलंदाजी करत होता. तर समोर गोलंदाजीसाठी झिम्बाब्वेचा तेंदई चतरा होता. या षटकातील 5व्या चेंडूवर सैफूद्दीनने पूल शॉट मारला. पण मागे वळून पाहिले तर स्टम्पवरिल बेल्स खाली पडल्या होत्या. आपण हिट विकेट झालो तर नाही ना? असा सैफूद्दीनला प्रश्न पडला.