मुंबई -टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात फिरकीपटू युझवेंद्र चहलला संघात स्थान मिळाले नाही. तेव्हा चहलची पत्नी आणि कोरियोग्राफर धनश्री वर्मा रिअॅक्ट झाली आहे.
युझवेंद्र चहलने टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने 49 कसोटी सामन्यात 25.30 च्या सरासरीने आणि 8.32 च्या इकोनॉमी रेटने 63 गडी बाद केले आहेत. चहलची कामगिरी पाहता त्याची निवड संघात निश्चित मानली जात होती. परंतु निवड समितीने रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वरूण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि राहुल चहर या फिरकीपटूंवर विश्वास दाखवला. यानंतर चहलची पत्नी धनश्री वर्मा इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून रिअॅक्ट झाली.
धनश्री वर्माची इन्स्टाग्राम स्टोरी व्हायरल होत आहे. यात ती म्हणते, आई म्हणते, ही वेळ देखील निघून जाईल. अभिमानाने जगा. कौशल्य आणि चांगले काम नेहमी साथ देतात. ही वेळ देखील निघून जाईल. गॉड इज ऑलवेज ग्रेट.