महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Yuvraj Singh Become Father: सिक्सर किंग युवराज सिंग झाला बाबा! - who is Hazel keech

'सिक्सर किंग' म्हणून ओळखल्या जाणारा युवराज सिंग बाबा ( Yuvraj Singh Become Father ) झाला आहे. युवराजची पत्नी हेजल कीचने एका गोड मुलाला जन्म दिला. ही गोड बातमी युवराज सिंगने सोशल मीडियावरून सर्वांना दिली.

युवराज सिंग झाला बाबा
Yuvraj Singh, wife Hazel blessed with baby boy

By

Published : Jan 26, 2022, 11:52 AM IST

नवी दिल्ली -माजी भारतीय अष्टपैलू आणि 'सिक्सर किंग' म्हणून ओळखल्या जाणारा युवराज सिंग बाबा ( Yuvraj Singh Become Father ) झाला आहे. युवराजची पत्नी हेजल कीचने एका गोड मुलाला जन्म दिला. ही गोड बातमी युवराज सिंगने सोशल मीडियावरून सर्वांना दिली. त्यानंतर त्याच्या चाहत्यांसह सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. हरभजन सिंग, इरफान पठाण, अनिल कुंबळे, टेनिस स्टार सानिया मिर्झा आदा खेळाडूंसह सिने स्टारनी युवराज आणि त्याच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत.

युवराजची हेजलसोबतची लव्हस्टोरी -

युवराजची हेजलसोबतची लव्हस्टोरी खूप स्पेशल आहे. युवी आणि हेजल 2011 मध्ये एका पार्टीत भेटले होते. हेजलला पाहताक्षणी युवी तिच्या प्रेमात पडला होता. हेजलजवळ जाऊन त्याने तिच्या अभिनयाची प्रशंसा केली. त्यानंतर एका 'कॉमन फ्रेंड्च्या' मदतीने युवराजने हेजलची माहिती मिळवली. इतकेच नव्हे तर त्या मित्रालाही हेजलपासून दूर राहायला सांगितले होते आणि तेव्हापासून युवराजची हेजलसोबतची लव्हस्टोरी सुरु झाली. सुरुवातीला हेजलने युवराजला अनेक वेळा नकार दिला होता. परंतु, युवराजने शेवटपर्यंत हार मानली नाही. सलग तीन वर्षे-तीन महिने एकमेकांना जाणून घेतल्यानंतर युवी आणि हेजल मित्र झाले. त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर २०१५ मध्ये दोघांनी लग्नाची घोषणा केली.

लग्नबंधनात अडकले -

युवराज आणि हेजल यांचा 12 नोव्हेंबर 2015 रोजी साखरपुडा झाला होता. तर दोघांनी 2016 मध्ये विवाह केला होता. बॉलिवूडमध्ये सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हेजल कीचने, 2011 मध्ये बॉडीगार्ड चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

युवराज आणि क्रिकेट -

12 डिसेंबर 1981 रोजी चंदीगढमध्ये युवराजचा जन्म झाला. टी-20 क्रिकेटमध्ये सहा चेंडूत सहा षटकार ठोकण्याचा विक्रम युवीच्या नावे आहे. युवीने टी-20 क्रिकेटमध्ये तर आपली छाप सोडलीच पण त्याआधी त्याने एकदिवसीय सामन्यात अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. युवराजने भारताकडून 304 एकदिवसीय सामने, 40 कसोटी आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 8701, 1900, 1177 धावा केल्या आहेत.

हेही वाचा -नेहराने हेजल कीचसोबत केलेल्या 'या' कृत्यामुळे युवराजने रुश्माकडे केली तक्रार

ABOUT THE AUTHOR

...view details