हैदराबाद:भारतीय महिला संघाचे ( Indian women's team ) पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यांनी शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयाची नोंद करायची होती, मात्र त्यांना तसे करता आले नाही. आयसीसीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर सामन्याच्या शेवटच्या षटकाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सामन्याच्या शेवटच्या षटकात वातावरण कसे होते, हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते.
मिताली राज, शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने आफ्रिकेला 275 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या चेंडूवर वॉल्व्हर्ट (80 धावा, 79 चेंडू, 11 चौकार) आणि मिग्नॉन डू प्रीझ ( Mignon do Prez ) (52) यांच्या बळावर तीन गडी राखून लक्ष्य गाठले.
शेवटच्या षटकांत 7 धावांची होती गरज -दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या षटकात सात धावांची गरज होती. दुस-या चेंडूवर, पटकन दुसरी धाव चोरण्याच्या प्रयत्नात त्रिशा चेट्टी हरमनप्रीत कौरच्या अचूक थ्रोवर बाद झाली. ती क्रिझवर पोहोचेपर्यंत दीप्ती शर्माने बेल्स ( Indian player Deepti Sharma ) उडवल्या. षटकाच्या 5व्या चेंडूवर दीप्ती शर्माने प्रीझला कौरकरवी झेलबाद केले, पण तो चेंडू नो-बॉल होता. यानंतर आफ्रिकेने शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत सामना जिंकला.
भारताच्या पराभवानंतर वेस्ट इंडिज संघाचा जल्लोष -सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेची फलंदाज एम्डू प्रीझने धाव घेताच वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी आनंदाने उड्या मारल्या. कारण भारताचा पराभव होताच उपांत्य फेरीत प्रवेश करणारा हा चौथा संघ ठरला. खुद्द वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानेच ( West Indies Cricket Board ) या खेळाडूंचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये वेस्ट इंडिजचे खेळाडू एकमेकांचा हात धरताना दिसत आहेत आणि शेवटच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 1 धाव घेताच कॅरेबियन खेळाडूंनी जल्लोष सुरू केला.
हेही वाचा -Ipl Created Employment : आयपीएलमुळे रोजगार आणि विकासास चालना