वेलिंग्टन:आयसीसी महिला विश्वचषक ( ICC Women World Cup 2022 ) स्पर्धेतील 23 वा सामना ( 23rd match of Women's World Cup ) वेलिंग्टन येते खेळला जाणार होता. हा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात खेळला जाणारा सामना पावसाचा व्यत्यय आल्याने रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपापल्या ठिकाणी सुरक्षित आहेत. यामुळे दक्षिण आफ्रिकेचे सहा सामन्यात नऊ गुण झाले आहेत. त्यामुळे हा संघ ऑस्ट्रेलियानंतर सेमीफायनलमध्ये पोहचणारा ( South Africa reach the semi-finals ) दुसरा संघ ठरला आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचे लीग स्टेजचे सामने संपले असून ते सात सामन्यांतून सात गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( South Africa v West Indies ) सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर प्रथम फलंदाजी करण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाला आमंत्रित केले होते. त्यानुसार या सामन्यात फक्त 10.5 षटके खेळली जाऊ शकली. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 61 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवावा लागला. त्यानंतर ही पुढे पाऊस सुरुच राहिल्याने पुढील खेळ होऊ शकला नाही.