मुंबई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अनिर्णीत राहण्याची शक्यता बळावली आहे. कारण अंतिम सामन्याचा पहिला व चौथा दिवस पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. आजच्या पाचव्या दिवसाचा खेळही पावसामुळे उशीराने सुरू होणार आहे. साउथम्पटन येथील हवामानाचा लहरीपणा लक्षात घेता उर्वरीत दोन दिवसांत १९६ षटकांचा खेळ होणे अशक्य आहे. यामुळे भारत-न्यूझीलंड यांना संयुक्त विजेतेपद मिळण्याची शक्यता वाढली आहे. इतका महत्वाचा सामना हवामानाकरिता बेभरवसा असलेल्या इंग्लंडच्या भूमीत का आयोजित केला याविषयावरून अनेक जणांनी आयसीसीला लक्ष्य केलं आहे. यात भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागची भर पडली असून त्याने आयसीसी आणि भारतीय संघ यांना फैलावर घेतलं आहे.
सेहवागने ट्विटच्या माध्यमातून, पहिल्या डावांत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचा समाचार घेतला आहे. याच ट्विटमधून त्याने आयसीसीवरही टीका केली आहे. ना फलंदाजांना योग्यरित्या वेळ मिळाला, ना आयसीसीला, असे म्हणतं त्याने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. विरेंद्र सेहवागच्या आधी इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन याने देखील आयसीसीवर कडाडून टिका केली आहे.
न्यूझीलंडची सामन्यावर पकड