साउथम्पटन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला उद्या शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. कसोटी क्रिकेटमधील सर्वात मानाच्या सामन्याबाबत संपूर्ण क्रिकेट विश्वात मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्याआधी आपल्या संघासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर भारतीय संघाचे दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये सर्व खेळाडू, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह संपूर्ण स्टाफ पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये अंतिम सामन्यासाठी निवडण्यात आलेले १५ खेळाडू प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह पाहायला मिळत आहेत. विराटने शेअर केलेल्या फोटोवर चाहते भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी भरभरून शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील महामुकाबल्याला भारतीय वेळेनुसार उद्या दुपारी ३ वाजता सुरूवात होणार आहे.
आयसीसीने दाखवली चेंडूची पहिली झलक