साऊथॅम्प्टन- जगभरातील कोट्यावधी क्रिकेट चाहते वा ज्या क्षणाची वाट पहात होते, तो क्षण आता आला आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली जागतिक कसोटी स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा महासंघर्ष सामना इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे आज सुरू होणार होता. मात्र येथे झालेल्या जोरदार पावसामुळे पहिल्या दिवसाच्या खेळावर पाणी फिरले आहे. अखेर आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे.
आपल्या माहिती करीता सांगायचे तर २३ जूनचा दिवस आयसीसीने राखीव दिन म्हणून ठेवला आहे. कोणताही खेळ वाया गेला तर तो २३ जून रोजी खेळला जाईल.
भारताने सामन्यासाठी अंतिम इलेव्हनची घोषणा केली आहे, तेथे न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. दोन्ही संघ खालीलप्रमाणे आहेत;