महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

WTC Final: मोहम्मद शमी भरमैदानात टॉवेलमध्ये; चाहते म्हणाले, आता लुंगी डान्स होईल

वॉटलिंगची विकेट घेतल्यानंतर शमी क्षेत्ररक्षणासाठी सीमारेषेजवळ आला. तेव्हा त्याने सीमारेषेजवळ असलेला टॉवेल पाहिला. तेवढ्यात पंचांनी लंचची घोषणा केली. तेव्हा शमीने ड्रेसिंग रुमकडे जाताना तो टॉवेल अंगाला गुंडाळला. हे पासून सर्वांना हसू आवरलं नाही.

wtc-final-mohammed-shami-wearing-towel-in-match-fans-says-now-lungi-dance-will-happen
WTC Final: मोहम्मद शमी भरमैदानात टॉवेलमध्ये; चाहते म्हणाले, आता लुंगी डान्स होईल

By

Published : Jun 22, 2021, 8:22 PM IST

साउथम्पटन - जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत न्यूझीलंडच्या फलंदाजांवर वर्चस्व मिळवलं. यात पाचव्या दिवशी लंचपर्यंत मोहम्मद शमीने दोन गडी बाद केले. त्याने रॉस टेलर आणि बीजे वॉटलिंग यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर शमीने मैदानात अशी कृती केली की ते पाहून खेळाडू, पंच यांच्यासह मैदानातील प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही.

वॉटलिंगची विकेट घेतल्यानंतर शमी क्षेत्ररक्षणासाठी सीमारेषेजवळ आला. तेव्हा त्याने सीमारेषेजवळ असलेला टॉवेल पाहिला. अशात पंचांनी लंचची घोषणा केली. तेव्हा शमीने ड्रेसिंग रुमकडे जाताना तो टॉवेल अंगाला गुंडाळला. हे पासून सर्वांना हसू आवरलं नाही.

या क्षणाचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते या व्हिडिओ भरभरून कमेंट करत आहेत. यातील एकाने शमीचा हा नवा ड्रेस कोड असल्याचे सांगितलं. तर एकाने मैदानात आता लुंगी डान्स होईल, असे म्हटलं आहे.

शमीचा अफलातून चेंडू वॉटलिंगच्या दांड्या गूल...

पाचव्या दिवशी देखील सामन्याला पावसामुळे उशिरा सुरूवात झाली. तेव्हा रॉस टेलर आणि केन विल्यमसन ही जोडी सावध खेळ करत होती. शमीने टेलरला बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. वैयक्तिक ११ धावांवर टेलरचा झेल हवेत सूर मारत शुबमनने टिपला. त्यानंतर हॅन्री निकोलसला इशांतने रोहितकडे झेल देण्यास भाग पाडलं. दुसरीकडून शमीने बीजे वॉटलिंगच्या दांड्या गुल करत न्यूझीलंडला जबर हादरा दिला. शमीने फेकलेला चेंडू वॉटलिंगला काही कळाच्या आत यष्ट्यावर जाऊन आदळला.

हेही वाचा -कोरोनामुळे २ वेळा लग्न पुढं ढकललं, पट्ट्याने अखेरीस गुपचूप उरकला विवाह

हेही वाचा -VIDEO: षटकार खेचल्यानंतर फलंदाजावरच आली डोक्याला हात लावून घेण्याची वेळ

ABOUT THE AUTHOR

...view details