साऊथम्पटन - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जूनदरम्यान रंगणार आहे. हा सामना इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये होणार आहे. दरम्यान, इंग्लंडमधील खेळपट्ट्या या वेगवान गोलंदाजांना अनुकूल मानल्या जातात. पण अंतिम सामन्यासाठी तयार करण्यात येणारी खेळपट्टी कशी असेल, या बद्दलची माहिती समोर आली आहे.
साऊथम्पटनच्या मैदानाचे पिच क्युरेटर सिमोन ली यांनी खेळपट्टीबाबत एका क्रीडा संकेसस्थळाशी बातचित केली. यावेळी ते म्हणाले, खेळपट्टीवर उसळी आणि वेग असेल, कारण माझी स्वत:ची तशी इच्छा असते. पण इंग्लंडमध्ये अशी खेळपट्टी तयार करणे आव्हानात्मक असते. याचं कारण येथील वातावरण असून ते बहुतेक वेळा खराब असतं. पण अंतिम सामन्याच्या काळात हवामानाचा अंदाज चांगला आहे. या दिवसांमध्ये चांगला सूर्यप्रकाश असेल, त्यामुळे वेग आणि उसळी असणारी खेळपट्टी बनवण्यात आम्ही यशस्वी होऊ.