लंडन - वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येथील ओव्हल मैदानावर सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगलीच कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन स्मिथ (१२१) आणि हेडला (१६३) धावांवर बाद करून भारताने या सामन्याव पकड निर्माण केली आहे. भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४६९ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाने १२१. ३ षटकात सर्वबाद ४६९ धावांवर मजल मारली.
ताजी माहिती हाती आले तेव्हा भारताची फलंदाजी सुरू आहे. कॅमेरून ग्रीनने चेतेश्वर पुजाराला १४ धावांवर बाद केले आहे. भारताच्या 13.5 षटकात 50 धावा झाल्या तर 3 गडी बाद झाले आहेत. सामना रंगात आला आहे. दोन्ही बाजूने चुरस आहे. मात्र सुरुवातीलाच भारताची पडझड झाल्याने ऑस्ट्रेलियाचे पारडे जड झाले आहे.
या सामन्याला काल सुरुवात झाली. यामध्ये भारताने नाणेफेक जिंकून सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिल्याच दिवशी भारताने चांगली सुरुवात केली होती. मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला शून्यावर बाद करत ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट घेतली. त्यानंतर शार्दूल ठाकूरने डेव्हिड वॉर्नरला (४३) तर मोहम्मद शमीने मार्कस लाबुशेनला (२६) धावांवर बाद केले. मात्र ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथने शानदार शतक झळकावत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची या सामन्यात जोरदार गोलंदाजी झाल्याचे दिसून येत आहे. त्यचाने कांगारुंचा तब्बल ४ विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ गडी बाद केले आहेत. तसेच रविंद्र जडेजालाने एक विकेट घेतली आहे. ऑस्ट्रेलियासाठी वॉर्नरने ६० चेंडूत ४३ धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजा तर शून्यावर बाद झाला आहे. त्याचबरोबर लाबुशेन २६ धावा करून तंबूत परतला. स्मिथने शतक ठोकले त्याने १२१ धावा केल्या. तसेच ट्रेविस हेडनेही १६३ धावांची दीड शतकी खेळी केली. त्याचबरोबर अलेक्स कॅरीने ४८ धावा केल्या. या धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ४६९ धावांपर्यंत मजल मारली आहे.