मुंबई- भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जूनदरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी दिग्गज खेळाडू त्यांचा अंदाज व्यक्त करत आहेत. यात ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरची भर पडली आहे. वॉर्नरने अंतिम सामन्याविषयी भाकित वर्तवलं आहे. तसेच त्याने भारतीय संघ कोणत्या खेळाडूंसह मैदानात उतरलं पाहिजे, याविषयी एक सल्ला दिला आहे.
डेव्हिड वॉर्नरने एका मुलाखतीत सांगितलं की, भारताने रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनीही अंतिम सामन्यात खेळावावं. तो पुढे म्हणाला, डावखुरा फिरकीपटू जडेजा एका विशिष्ट उंचीने सातत्याने गोलंदाजी करु शकतो. जडेजाने डावखुऱ्या फलंदाजांच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी केलेली आहे. जडेजा आणि अश्विन हे दोन्ही फिरकीपटू न्यूझीलंडवर भारी पडतील, असे मला वाटते.