लंडन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. लंडनला पोहोचल्यानंतर दोन्ही संघांनी सराव सुरू केला आहे. आत सामन्याची उत्सुकता आहे.
ICC ने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम कसोटी सामन्यासाठी एक प्रोमो जारी केला आहे. त्याला अल्टीमेट टेस्ट असे नाव दिले आहे. त्यामध्ये विराट कोहली तसेच स्टीव्ह स्मिथ दाखवले आहेत. 1 मिनिटांच्या या प्रोमो व्हिडिओमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याचे काही संस्मरणीय क्षण दाखवण्यात आले आहेत.
विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ :या प्रोमोमध्ये खासकरून विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथला फोकसमध्ये ठेवण्यात आले आहे. 7 जून ते 11 जून दरम्यान ओव्हलमध्ये होणार्या या कसोटी सामन्याला अल्टीमेट टेस्ट असे नाव देऊन अधिक रोमांचक बनवण्याची तयारी सुरू असल्याचे तुम्ही या 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता.
सलग दुसऱ्यांदा WTC फायनल खेळण्याची संधी :तुम्हाला आठवत असेल की गेल्यावर्षी खेळल्या गेलेल्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आले होते. ज्यामध्ये किवी टीमने भारताचा पराभव करत WTC चा पहिला चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता. यानंतर भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा WTC फायनल खेळण्याची संधी मिळाली. यावेळी टीम इंडिया आयसीसी विजेतेपद पटकावून आपल्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल.
भारतीय संघातील खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव. आणि जयदेव उनाडकट.
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू : पॅट कमिन्स (क), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ स्मिथ, मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर.