महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

WTC Final 2023 IND VS AUS : टॉस जिंकून भारताची गोलंदाजी, जाणून घ्या प्लेइंग 11

आजपासून सुरु झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

WTC Final 2023 IND VS AUS
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

By

Published : Jun 7, 2023, 3:21 PM IST

लंडन : लंडनच्या ओव्हल क्रिकेट मैदानावर आज दुपारी 3 वाजल्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. फायनल मॅचमध्ये टीम इंडिया ओडिशा ट्रेन दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी हातावर काळ्या पट्टी बांधून खेळणार आहे.

भारतीय संघ प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज. ;ऑस्ट्रेलिया संघ प्लेइंग 11 : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

खेळपट्टीचा अहवाल : ओव्हलची खेळपट्टी सामान्यत: भरपूर बाउंस देते. त्यामुळे ती वेगवान आणि संथ दोन्ही गोलंदाजांसाठी चांगली मानली जाते. यासोबतच येथे फलंदाजांनाही फटके खेळण्याची संधी मिळते. चेंडूंमध्ये फारशी हालचाल नसेल, तर येथे पुन्हा एकदा फलंदाजांची ताकद दिसून येईल. हवामानाच्या अंदाजानुसार, तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास असू शकते. तसेच शनिवार, रविवार आणि सोमवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास सामन्यात व्यत्यय येऊ शकतो.

आकडे काय सांगतात? :

  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या चार कसोटी मालिका जिंकल्या आहेत, ज्यात दोन मायदेशात आणि दोन ऑस्ट्रेलियात झाल्या आहेत. भारताने सर्व मालिका 2-1 च्या फरकाने जिंकल्या आहेत.
  • द ओव्हल येथे ऑस्ट्रेलिया (0.411) आणि भारत (0.400) यांचे विजय-पराजय गुणोत्तर जवळपास समान आहे. ऑस्ट्रेलियाने येथे त्यांच्या 38 पैकी 7 कसोटी जिंकल्या आहेत आणि 17 गमावल्या आहेत, तर भारताने 14 पैकी 2 जिंकल्या आहेत आणि 5 गमावल्या आहेत.
  • विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2000 कसोटी धावा करणारा भारताचा पाचवा फलंदाज होण्यापासून फक्त 21 धावांनी दूर आहे. या सामन्यात 21 धावा केल्यानंतर तो सचिन तेंडुलकर (3630), व्हीव्हीएस लक्ष्मण (2434), राहुल द्रविड (2143) आणि चेतेश्वर पुजारा (2033) या खेळाडूंच्या यादीत सामील होईल.
  • ओव्हलवर खेळल्या गेलेल्या तीन कसोटींमध्ये, स्टीव्हन स्मिथने 97.75 च्या सरासरीने 391 धावा केल्या आहेत. यातील पाच डावांमध्ये दोन शतके आणि 80 धावांची खेळी समाविष्ट आहे.
  • ओव्हलमध्येच भारतीय संघाने 1971 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा इंग्लंडचा पराभव केला होता. त्यावेळी संघाचे कर्णधार अजित वाडेकर होते आणि लेगस्पिनर चंद्रशेखरने 38 धावांत 6 खेळाडू बाद केले होते.
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत झालेल्या एकूण 106 कसोटी सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियाने 44 सामने जिंकले आहेत, तर भारताने 32 सामने जिंकले आहेत. तसेच 29 ड्रॉ आणि एक टाय झाला आहे.

हेही वाचा :

  1. wtc final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामन्यात भिडणार भारत आणि ऑस्ट्रेलिया; जाणून घ्या दोन्ही संघाचे संभाव्य खेळाडू
  2. MPL 2023 : IPL प्रमाणे आता राज्यात MPL चे आयोजन, 'हे' आहेत संघ

ABOUT THE AUTHOR

...view details