नवी दिल्ली :डब्ल्यूपीएलमध्ये आज दुहेरी हेडर सामने खेळले जातील. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता होणार आहे. दिल्लीची कमान मेग लॅनिंगच्या हातात आहे, जिने अलीकडेच ऑस्ट्रेलियाला महिला T20 विश्वचषक चॅम्पियन बनवले. त्याचवेळी भारताला अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक जिंकून देणारी कॅप्टन शेफाली वर्माही दिल्लीत आहे. स्मृती मानधना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे (RCB) कर्णधार असणार आहे.
गुजरात जायंट्सला महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियनने 20 षटकांत 5 गडी गमावून 207 धावा केल्या. एमआयच्या 207 धावांना प्रत्युत्तर देताना गुजरात जायंट्सचा संघ 15.1 षटकांत 64 धावांत गुंडाळला. जायंट्सची कर्णधार बेथ मुनीला डावाच्या पहिल्याच षटकात घोट्याला मार लागल्याने तिला सामन्यातून बाहेर पडावे लागले. त्याचवेळी मुंबईची कर्णधार हरमनप्रीतने 30 चेंडूत 65 धावा केल्या. तिला स्नेह राणाने बाद केले. गुजरातकडून दयालन हेमलताने नाबाद २९ धावा केल्या.