नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजची अदानी संघ गुजरात जायंट्सची मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेटमधील 23 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर मितालीने गेल्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. त्याच वेळी, भारताची माजी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी यांची वूमन प्रीमियर लीग (WPL) मध्ये मुंबई फ्रँचायझीच्या गोलंदाज प्रशिक्षक पदी म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे झूलन गोस्वामी आता मुंबई टीमच्या खेळाडूंना गोलंदाजीच्या टिप्स देतील.
सौरव गांगुली पुन्हा सामील : 40 वर्षीय झुलनने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार माजी कर्णधार सौरव गांगुलीने ही माहिती दिली आहे. सौरव गांगुली नुकताच इंडियन प्रीमियर लीगमध्ये पुन्हा सामील झाला आहे. तो दिल्ली कॅपिटल्सचा संघ संचालक म्हणून फ्रेंचायझीसोबत आहे. गांगुलीने सांगितले की दिल्ली कॅपिटल्सने झुलन गोस्वामी यांना त्यांच्यासोबत काम करण्याविषयी ऑफर केली होती. परंतू त्या मुंबई फ्रँचायझीसोबत जात आहे. त्यांनी दिल्ली कॅपिटल्ससोबत जाण्यास नकार दिला.
झुलनची क्रिकेट कारकीर्द : झुलन गोस्वामी यांनी त्यांच्या कारकीर्दीत वनडेमध्ये 255 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी कसोटी सामन्यात 44 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 मध्ये 56 विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अलीकडेच महिला प्रीमियर लीगसाठी संघांचा लिलाव केला. यात अदानी समूहाने सर्वात मोठी बोली लावली. अहमदाबादला १२८९ कोटी रुपयांना विकत घेतले. तर मुंबई टीमला इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने विकत घेतले आहे. रॉयल चॅलेंजर्स ग्रुपने बंगळुरू संघ विकत घेतला.
मिताली राजची कारकीर्द : मिताली राजने भारतासाठी 12 कसोटी, 232 एकदिवसीय आणि 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मितालीने वनडेमध्ये 7805 धावा केल्या, ज्यात 7 शतके आणि 64 अर्धशतकांचा समावेश आहे. मितालीच्या नावावर कसोटी सामन्यात ६९९ आणि टी-२० मध्ये २३६४ धावा आहेत. मिताली राजने तिचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२२ च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. मितालीने या सामन्यात ६८ धावांची इनिंग खेळली होती. मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाला दोनदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्यात यश आले.
हेही वाचा :Suryakumar Yadav Catch Video : सूर्यकुमार यादवला फिन ऍलनचा झेल टिपताना पाहून सगळेच आवाक, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव