मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore ) संघ आयपीएल स्पर्धेत गेल्या चौदा वर्षापासून खेळत आहे. परंतु या संघाला अजून एकदा ही आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरता आलेले नाही. आता पर्यंत या संघाने एक ही ट्रॉफी न जिंकल्याची खंत त्यांच्या मनात आहे. यावर आता आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने ( Former RCB captain Virat Kohli ) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीला वाटते, जर कधी आगामी सत्रात आरसीबी संघाने विजेतेपद मिळवले, तर सर्वात अगोदर विराट कोहलीला एबी डिविलियर्सची नाव आठवेल. कारण हे विजेतेपद त्याच्यासाठी खुप मायने राखत होते.
विराटने (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुच्या बोल्डमध्ये बोलताना म्हणाला की, “मला आठवते, जेव्हा डिविलियर्सने (AB De Villiers) क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला (AB De Villiers IPL Retirement) होता. तेव्हा त्याने मला एक व्हॉईस मॅसेज पाठवला होता. त्यावेळी मी टी-20 विश्वचषक झाल्यानंतर भारतात परत येत होतो. आम्ही दुबईमध्ये होतो आणि तेव्हा मला त्याचा व्हॉईस मॅसेज मिळाला. अनुष्काही त्यावेळी माझ्यासोबत होती. डिविलियर्सचा मॅसेज ऐकून मी चकित झालो होतो आणि मी अनुष्काकडे पाहात राहिलो.”