इंदूर : इंदूर येथे खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 109 धावांवर आटोपला. या नंतर ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीला उतरला. त्यांनी पहिल्या डावात 197 धावा करत भारतावर 88 धावांची आघाडी घेतली. भारताने दुसऱ्या डावात 163 धावा करत ऑस्ट्रेलियाची 88 धावांची आघाडी कमी केली. दुसऱ्या डावात भारताने ऑस्ट्रेलियावर एकूण 75 धावांची आघाडी घेतली. सामन्याच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने भारताच्या 8 विकेट घेतल्या. आता ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी फक्त 76 धावा करायच्या आहेत. विशेष म्हणजे सामन्याचे पूर्ण 3 दिवस अद्याप बाकी आहेत. त्यामुळे इंदूरचा सामना जिंकणे भारताला अशक्य वाटत आहे.
तर ऑस्ट्रेलियाचे स्थान निश्चित :जर भारताने इंदूरचा सामना गमावला तर भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळणे कठीण होऊ शकते. मात्र दुसरीकडे जर ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटी जिंकली तर त्यांचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल खेळणे निश्चित होईल. पराभवानंतर डब्ल्यूटीसी फायनल खेळण्यासाठी भारताला अहमदाबादमध्ये मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना जिंकावा लागेल.
तर भारत न्यूझीलंडवर अवलंबून राहील : वास्तविक, जर ऑस्ट्रेलियाने मालिका 2-1 ने गमावली किंवा 2-2 अशी बरोबरीत सोडली, तर भारताला फायनल खेळण्यासाठी श्रीलंका आणि न्यूझीलंड मालिकेवर अवलंबून राहावे लागेल. कारण गुणतालिकेत श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत श्रीलंका न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत 2-0 ने पराभूत झाल्यास भारताचा मार्ग सुकर होईल. याचाच अर्थ फायनल खेळण्यासाठी भारताला न्यूझीलंडच्या विजयावर अवलंबून राहावे लागेल.