हैदराबादWorld Cup 2023 : क्रिकेटप्रेमी 2023 च्या विश्वचषकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कोणताही क्रिकेट सामना जिंकण्यासाठी फलंदाजी, गोलंदाजांची महत्त्वाची भूमिका असते. त्याच वेळी, क्षेत्ररक्षण देखील महत्त्वपूर्ण असतं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर विरोधी संघाला धावसंख्येचा पाठलाग करण्यापासून रोखलं जातं. क्रिकेटमध्ये एक सुप्रसिद्ध म्हण आहे, 'कॅच्स आर व्हॉट यू द मॅचेस'. आज आम्ही तुम्हाला इतिहासातील पाच सर्वोत्तम कॅचबद्दल सांगणार आहोत.
शेल्डन कॉट्रेल : वेस्ट इंडिजचा खेळाडू शेल्डन कॉट्रेलनं घेतलेली कॅच विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम कॅच मानली जाते. विश्वचषक 2019 मध्ये, शेल्डन कॉट्रेलनं ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथची अप्रतिम कॅच घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. कॉटरेल सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओशानं थॉमसच्या चेंडूवर स्मिथनं लाँग षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण डीप फाइन लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या कॉटरेलनं दुरून धावत येऊन सीमारेषेच्या आत उडी मारली. त्यानंतर डाव्या हातानं चेंडू प्रथम बाहेर फेकला. त्यानंतर त्यानं सीमारेषेच्या आत येऊन अप्रतिम कॅच घेतली. ही कॅच पाहून स्मिथही थक्क झाला होता. त्यावेळी स्मिथ 73 धावांवर खेळत होता.
स्टीव्ह स्मिथ :ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथनं दुसरी सर्वोत्तम कॅच घेतली आहे. वर्ल्ड कप 2015 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात स्मिथनं फाइन लेगवर क्षेत्ररक्षण करताना टॉम लॅथमची शानदार कॅच घेतली होती. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या चेंडूवर लॅथमनं हवेत जोरदार फटका मारला होता. मात्र, फाइन लेगवर उभ्या असलेल्या स्मिथनं उजवीकडे उडी मारून एक अप्रतिम कॅच घेतली. तेव्हा लॅथम 14 धावांवर फलंदाजी करत होता.
जेसी रायडर : विश्वचषकाच्या इतिहासातील तिसरी सर्वात नेत्रदीपक कॅच न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू जेसी रायडरनं 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत घेतली होती. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तो पॉइंटवर क्षेत्ररक्षण करत होता. वेगवान गोलंदाज टीम साऊदीच्या चेंडूवर उपुल थरंगानं पॉइंटवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. पण, 'पॉइंट'वर उभ्या असलेल्या रायडरनं डाव्या हातानं हवेत उडी मारत हवेतच कॅच घेतली. 30 धावांवर खेळत असताना रायडरनं उपुल थरंगाला पव्हेलियमध्ये पाठवलं होतं.
अजय जडेजा : विश्वचषकाच्या इतिहासातील चौथी सर्वात शानदार कॅच भारताचा माजी खेळाडू अजय जडेजानं घेतली आहे. जडेजानं 1992 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कपिल देवच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ॲलन बॉर्डरची अप्रतिम कॅच घेतली होती. त्यावेळी जडेजा डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. बॉर्डरनं कपिल देवच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण जडेजानं धावून हवेत उडी मारत आश्चर्यकारक झेल घेतला होता. जडेजाचा हा झेल आयसीसी विश्वचषकातील सर्वोच्च झेलांपैकी एक आहे.
कपिल देव :क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासातील पाचवी सर्वोत्तम कॅच भारताचा माजी कर्णधार कपिल देवच्या नावावर आहे. कपिल देवनं 1983 च्या विश्वचषक फायनलमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्स इथं जबरदस्त कॅच घेतली होती. वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज व्हिव्ह रिचर्ड्सनं भारताचा माजी वेगवान गोलंदाज मदन लालच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा कपिल देव स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षण करत होते. त्यावेळी कपिल देव यांनी धावत कॅच घेतली होती. क्षेत्ररक्षकांना बॅकवर्ड धावत जाऊन झेल घेणं नेहमीच अवघड असतं. पण कपिल देव यांनी ही कॅच सोपी केली होती. ही कॅच अंतिम फेरीत टर्निंग पॉइंट ठरली होती, ज्यामुळं भारताला विश्वचषक जिकंता आलं होतं.
हेही वाचा -
- Cricket World Cup 2023 : हे आहे भारतातील सर्वात आधुनिक क्रिकेट स्टेडियम, कितीही पाऊस आला तरी मॅच होणार नाही रद्द!
- Cricket World Cup 2023 : 'भारत उपांत्य फेरीत नक्कीच प्रवेश करणार', किरण मोरेंची भविष्यवाणी
- Cricket World Cup 2023 : सलग दोन विश्वचषकात फायनलमध्ये पराभव, आता तरी न्यूझीलंडचा ट्रॉफीचा दुष्काळ संपणार का?