चेन्नईWORLD CUP 2023 :भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज शुभमन गिलला डेंग्यूची लागण झालीय. त्यामुळं तो ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाहीय. मात्र, यावर आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी गिलबाबत मोठा खुलासा केलाय.
सामन्यात खेळण्याची शक्यता :स्टार सलामीवीर शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. रविवारी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या लढतीपूर्वी गिल आजारपणाशी झुंज देत आहे, परंतु द्रविडनं सांगितलं की, 24 वर्षीय शुभमन गिल अद्याप या समान्यातून वगळण्यात आलेलं नाही.
शुभमन गिलला बरं वाटतय :राहुल द्रविड शुक्रवारी म्हणाले की, 'आज शुभमन गिलला बरं वाटतय. वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. आता आमच्याकडं 36 तास शिल्लाक आहेत, वैद्यकीय पथक काय निर्णय घेणार त्याकडं लक्ष आहे. मात्र, गिलला आज पूर्वीपेक्षा नक्कीच बरं वाटत असल्या द्रविड यांनी म्हटलंय.
शुभमन गिल उत्तम फलंदाज : स्टार सलामीवीर शुभमन गिल ऑस्ट्रेलियाचा विरुद्धचा सामना खेळणार का असा प्रश्न राहुल द्रविड यांना विचारण्यात आला होता. त्यावर द्रविड म्हणाले की, शुभमन गिल उजव्या हाताचा शक्तिशाली फलंदाज आहे. त्याला अजूनही ऑस्ट्रेलियाचा विरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आलेलं नाहीय. 'वैद्यकीय पथकानं अद्याप याबाबत काही माहिती दिली नाहीय.
गिल शानदार फॉर्ममध्ये : येणाऱ्या काही तासात पुढील माहिती देण्यात येणार असल्याचं द्रविड यांनी म्हटलं आहे. तसंच वैद्यकीय पथक शुभमन गिलचं निरीक्षण करत आहे. त्याला परवा बर वाटल्यावर बघूया असं द्रविड यांनी म्हटलंय. भारताचा सलामीवीर शुभमन गिल हा शानदार फॉर्ममध्ये आहे. गिल हा भारताच्या आयसीसी विश्वचषकासाठी टीम इंडियासाठी महत्वाचा खेळाडू मानला जात आहे. मात्र तो अचानक अजारी पडल्यामुळं संघासाची डोकेदुखी वाढली आहे.
गिलच्या ऐवजी इशान किशन? : शुक्रवारी सकाळी शुभमन गिलला डेंग्यू झाल्याची वाईट बातमी समोर आलीय. गिलच्या जागी झारखंडचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनला भारतीय संघात संधी देण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. कारण भारत एमए चिदंबरम स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळणार आहे. रविवारी चेन्नईत होणाऱ्या लढतीसाठी दोन दिवस बाकी असताना, शुक्रवारी मैदानावर इशान किशनसह भारतीय संघ घाम गाळताना दिसतोय.
हेही वाचा -
- World Cup 2023 : भारताच्या फलंदाजीसह, गोलंदाजीत काय आहे खास? कोणते खेळाडू करणार विश्वचषकात कहर, वाचा सविस्तर
- Asian Games २०२३ : चक दे इंडिया! आशियाई स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी, अंतिम सामन्यात जपानचा धुव्वा उडवला
- Cricket World Cup 2023 : 'राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीय, तो प्रत्येक सामना गांभीर्यानं घेतो'; धोनीच्या बालपणीच्या मित्राची 'ईटीव्ही भारत'ला खास मुलाखत