नवी दिल्ली WORLD CUP 2023: टीम इंडियाचा मास्टर स्ट्रायकर धडाकेबाज युवा खेळाडू शुभमन गिल, भारताच्या पहिल्याच सामन्यापूर्वी आजारी पडलाय. चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताच्या पहिल्या ICC क्रिकेट विश्वचषक 2023 सामन्या आगोदरच त्याला तापानं गाठलंय. याबाबत व्यवस्थापनानं अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, गिल बाबत आरोग्य बुलेटिन उद्या येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा स्थितीमुळं भारताच्या संघावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. गिल सध्या फॉर्ममध्ये असून संघासाठी शानदार खेळत आहे. गिलमध्ये तग धरण्याची क्षमता तसंच त्याचा आत्मविश्वास दांडगा आहे. त्याला झालेलं व्हायरल इन्फेक्शन कमी झाल्यास गिल संघात पदार्पण करण्याची शक्यता आहे. परंतु तसं न झाल्यास त्याला सामना मुकावा लागणार आहे. गिलची अनुपस्थिती भारतीय संघासह कर्णधार रोहित शर्माची डोकेदुखी वाढणारी आहे. भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया संघांविरुद्ध केलेल्या प्लॅनिंगवर पाणी फिरू शकतं. त्यामुळं गिलचं संघात नसनं टीम इंडियासाठी धोक्याचं ठरु शकतं.
सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघ क्रमांक एकवर : सध्या भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्यामुळं विश्वचषकावर पुन्हा एकदा नाव कोरण्याची संधी मिळणार आहे. तसंच विश्वचषक भारतातच होत असल्यानं टीम इंडियासाठी अनुकूल वातावरण आहे. भारतीय संघातील खेळाडूंना भारतीय हवामान, खेळपट्ट्यांचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. तसंच नविन खेळडूना विश्वचषकात चांगली कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे. सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघ क्रमांक एकवर दिसत आहे. विश्वचषक जिंकण्याचं सर्व खेळाडूंचं स्वप्न आहे. घरच्या मैदानाचा फायदा, बेधडक, धडाकेबाज युवा खेळाडू, आशिया कप चॅम्पियनमुळं भारताचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. भारतानं नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकलीय. त्यामुळं भारतीय खेळाडूंच्या अपेक्षांना बळ मिळणार आहे. या संघात हिटमॅन रोहित शर्मा, विराट कोहली यांचा उल्लेख होतोय, पण रवींद्र जडेजाचा उल्लेख होताना दिसत नाहीये. जो फलंदाजी, गोलंदाजी या दोन्हीत कमाल करू शकतो. टीम इंडियाची बॅटिंग लाईनअप 7 व्या क्रमांकापर्यंत मजबूत आहे. जडेजानंतर कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह यांच्यासारख्ये दिग्गज खेळाडू आहेत.
बॅटिंग लाइन-अप -
विराट कोहली :पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम, विराट कोहलीला टक्कर देऊ शकतो. पण विराट कोहली विश्वचषकात त्याच्या दमदार कामगिरीची वाट पाहात आहे. विराट कोहली वेगानं धावा करतो. विराट कोहलीला सचिन तेंडुलकरला मागं टाकायचं आहे. त्यामुळं संपूर्ण भारताची फलंदाजी ही सर्वात मजबूत आहे.
रोहित शर्मा : भारतीय कर्णधार रोहित शर्मा वेगवान गोलंदाजांवर बॅटिंगनं चांगलाच बरसतो. त्यामुळं विजयाचा पाठलाग करताना संघाला त्याच्या फलंदाजीचा उत्तम फायदा होतो. रोहित शर्मा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे.
शुभमन गिल : भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलला वेगळ्या परिचयाची गरज नाही. गिल कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यास सक्षम असल्याचं त्यानं अनेक वेळा सिद्ध केलंय. विश्वचषकात या युवा फलंदाजावर मोठी जबाबदारी असेल.
सूर्यकुमार यादव :सूर्याकुमार जेव्हा मैदानात येतो, तेव्हा त्याला बाद करणं खूप अवघड असतं. स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्यात चौकार, षटकाराचा पाऊस पाडण्याची त्याच्यात क्षमता आहे. आपल्या इच्छेनुसार षटकार आणि चौकार मारण्यात तो माहीर आहे. तो संघातील सर्वात वेगवान, आक्रमक फलंदाजाची भूमिका बजावतो.
केएल राहुल : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलचं प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झालं. जेव्हापासून त्यानं पुनरागमन केलं, तेव्हापासून तो संघासाठी चमकदार खेळ करत आहे. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध पुनरागमन करताना त्यानं शानदार शतक झळकावलं.
श्रेयस अय्यर : शुभमन गिलप्रमाणेच श्रेयस अय्यरकडेही स्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता आहे. अय्यर हा मधल्या फळीचा कणा आहे. तो संघाला समतोल प्रदान करु शकतो. तो या विश्वचषकात उत्तम खेळाडू ठरू शकतो.