महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

World Cup २०२३ : आगामी एकदिवसीय विश्वचषकसाठी आज होणार भारतीय संघाची घोषणा; कोणाला संधी?

World Cup २०२३ : भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी आज भारतीय संघाची घोषणा होणार आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर श्रीलंकेतील कॅंडी येथे पत्रकार परिषदेत संघाची घोषणा करतील.

World Cup 2023
एकदिवसीय विश्वचषक २०२३

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 7:48 AM IST

Updated : Sep 5, 2023, 10:09 AM IST

मुंबई : World Cup २०२३ :आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी बीसीसीआय आज (५ सप्टेंबर) भारतीय संघाची घोषणा करणार आहे. १२ वर्षानंतर देशात प्रथमचं विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलंय. भारतात शेवटचा विश्वचषक २०११ साली आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत एकही आयसीसी स्पर्धा जिंकू शकलेला नाही. यंदा मायदेशात होणारा विश्वचषक भारतासाठी ट्रॉफी जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे.

चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार : मंगळवारी, मुख्य निवडकर्ते अजित आगरकर श्रीलंकेतील कॅंडी येथे पत्रकार परिषदेत विश्वचषक संघाची घोषणा करतील. इथे सध्या भारतीय संघ आशिया चषक स्पर्धा खेळत आहे. निवड समितीत अजित आगरकर यांच्यासह शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ यांचा समावेश आहे. कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना संघात स्थान मिळणं निश्‍चित असलं तरी, चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हे पाहणं महत्वाचं आहे. गेल्या विश्वचषकातही हा स्पॉट चर्चेचा विषय बनला होता.

हेही वाचा :Asia Cup २०२३ : भारताचा नेपाळवर 10 विकेटनं विजय, रोहित-गिलची दमदार खेळी, सुपर 4 मध्ये प्रवेश

केएल राहुल की इशान किशन : निवड समिती, नुकताच दुखापतीतून सावरलेला केएल राहुलला संघात स्थान देईल की, युवा इशान किशनवर विश्वास ठेवला जाईल, याकडे सर्वांचं लक्ष आहे. इशाननं आशिया चषकाच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध संघाला संकटातून बाहेर काढलं होतं. त्यामुळे त्याचा दावा मजबूत मानला जातोय. मुंबईकर श्रेयस अय्यरनही दुखापतीनंतर टीम इंडियात पुनरागमन केलंय. त्याचाही संघात समावेश केला जाऊ शकतो. अष्टपैलू हार्दिक पांड्याची निवड निश्चित आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणारा अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि युवा शुभमन गिलचीही संघात निवड होऊ शकते.

अंतिम सामना इथे होणार : २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, मुंबई, पुणे आणि धर्मशाला यासह भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी खेळवला जाईल. अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे, जिथे एक लाख लोक बसण्याची क्षमता आहे.

हेही वाचा :Jasprit Bumrah Baby : जसप्रीत बुमराहच्या घरी बाळाचं आगमन, सोशल मीडियावर पोस्ट केला फोटो

Last Updated : Sep 5, 2023, 10:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details