माउंट मौनगानुई :आयसीसी महिला विश्वचषक ( ICC Women's World Cup ) स्पर्धेतील सतरावा सामना शुक्रवारी माउंट मौनगानुई येथे पार पडला. हा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश यांच्यात झाला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने बांगलादेशवर चार धावांनी विजय ( WI Women won by 4 runs ) मिळवला. या विजयात वेस्ट इंडिजची गोलंदाज हेली मॅथ्यू आणि एफी फ्लेचर यांनी महत्वाची भमिका निभावली. वेस्ट इंडिज संघाने आपल्या 140/9 धावांचा बचाव करताना, बांगलादेशला तीनचेंडू राखत 136 धावांवर गुंडाळले.
वेस्ट इंडिज महिला संघाने पाच पैकी तीन विजयांसह सहा गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर बांगलादेश चार सामन्यांतून दोन गुणांसह सातव्या स्थानावर आहे. सामन्याचा निकाल शेवटच्या सहा चेंडूंमध्ये आला. वेस्ट इंडिजची अनुभवी कर्णधार स्टेफनी टेलर ( Captain Stephanie Taylor ) (3/29) हिने नाहिदा अख्तरला (नाबाद 25) गोलंदाजी करत होती. बांगलादेशच्या हातात फक्त एक विकेट होती आणि विजयासाठी आठ धावांची गरज होती.
गरज असताना टेलरने पुन्हा एकदा आपल्या देशासाठी चेंडू हाती घेतला आणि षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर फरिहा त्रिस्नाला शून्यावर बाद ( Fariha Trisna dismisses to zero )केले. तसेच अटीतटीच्या सामन्यात वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला. तसेच हेली मॅथ्यूज (4/14) आणि एफी फ्लेचर (3/29) या फिरकीपटूंनी वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक बळी घेतले. त्याचबरोबर यष्टिरक्षक शेमेन कॅम्पबेल (नाबाद 53) यांनीही चांगली कामगिरी केली.