हॅमिल्टन :आयसीसी महिला विश्वचषक ( ICC Women's World Cup ) स्पर्धा सध्या न्यूझीलंड येथे खेळली जात आहे. या स्पर्धेतील दहावा सामना भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ( India v West Indies ) संघात झाला. हा सामना भारताने 155 धावांनी जिंकला. तसेच वेस्ट इंडिज संघाचा हा या स्पर्धेतील पहिलाच पराभव होता. या पराभवानंतर ही वेस्ट इंडिज संघाला एक मोठा धक्का बसला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने ( International Cricket Council ) वेस्ट इंडिज संघाला सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने मॅच फीच्या 40 टक्के दंड ठोठावला आहे. आघाडीच्या फळीतील फलंदाज स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांच्या शतकांमुळे भारताने स्पर्धेतील त्यांच्या मोहिमेच्या तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 155 धावांनी पराभव केला. स्मृतीने 119 चेंडूत 123 धावा केल्या, त्याचबरोबर हरमनप्रीत सोबत 184 धावांची भागीदारी केली. हरमनप्रीतने देखील 107 चेंडूत 109 धावा केल्या.