हॅमिल्टन :भारताची सलामी फलंदाज स्मृती मंधानाने स्विकार केला आहे की, ती जेव्हा 90 धावांवर खेळत होती. तेव्हा ती थोडी नर्व्हस झाली होती. या दरम्यान तिला एक जीवनदान देखील मिळाले होते. त्यानंतर स्मृती मंधानाने आपले शतक पूर्ण केले आणि सुटकेचा निश्वास सोडला. ज्यामुळे भारतीय संघाने शनिवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघावर 155 धावांनी विजय मिलवला. यामध्ये स्मृती मंधानाच्या 123 धावांच्या ( Smriti Mandhana 123 runs ) खेळीचे योगदान महत्वाचे होते.
सामना संपल्यानंतर बोलताना स्मृती मंधाना म्हणाली ( Smriti Mandhana said ), मी आज (12 मार्च) जेव्हा नव्वद धावांवर पोहचली, तेव्हा थोडी नर्व्हस झाल होती. ज्यानंतर मी शतक पूर्ण केले. यासाठी खरं तर मी प्रतिस्पर्धी वेस्ट इंडिज संघाचे आभार मानले पाहिजे. त्यानंतर स्मृती पुढे सांगितले की, 119 चेंडूतील 123 धावांची ही खेळी तिच्या नेहमीच्या मोठ्या खेळीपेक्षा वेगळी होती.