महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 3, 2022, 3:56 PM IST

ETV Bharat / sports

Women World Cup : महिला विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का ; एश्ले गार्डनरला कोरोनाची लागण

क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू ( cricket.com.au ) ने गुरुवारी अहवाल दिला की, 24 वर्षीय खेळाडू इंग्लंड (5 मार्च) आणि पाकिस्तान (8 मार्च) विरुद्धच्या सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाही. ऑस्ट्रेलियाचा तिसरा सामना 13 मार्चला न्यूझीलंड विरुद्ध वेलिंग्टन येथे होणार आहे.

Ashley
Ashley

चर्चगेट : महिला विश्वचषक स्पर्धेला ( Women World Cup ) 4 मार्च पासून सुरुवात होणार आहे. त्या अगोदर सर्व संघानी तयारी केली आहे. त्याचबरोबर या विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज झाले असताना ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला. स्पर्धा सुरु होण्याअगोदर ऑस्ट्रेलिया संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे.

न्यूझीलंडमध्ये सुरु होत असलेल्या आयसीसी महिला विश्वकपच्या अगोदर ऑस्ट्रेलियाच्या संघातील एशले गार्डनर या खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह ( Ashley Gardner tests Covid positive ) आला आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघाच्या ताफ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच स्टार ऑलराउंडर एशले गार्डनर ही विश्वकपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांना मुकणार आहे.

कारण न्यूझीलंड सरकारच्या कोविड प्रोटोकॉलनुसार ( Covid Protocol of New Zealand Government ) एशले गार्डनर दहा दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल. क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू ने माहिती दिली की, 24 वर्षीय खेळाडू इंग्लंड (5 मार्च) आणि पाकिस्तान (8 मार्च) विरुद्धच्या सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाही. ऑस्ट्रेलियाचा तिसरा सामना 13 मार्चला न्यूझीलंड विरुद्ध वेलिंग्टन येथे होणार आहे.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, अष्टपैलू अॅनाबेल सदरलँड आणि सहकारी फिरकी गोलंदाज ग्रेस हॅरिस ( Spinner Grace Harris ) गार्डनरच्या जागी आहेत, ज्यांनी मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या सराव सामन्यात 32 चेंडूत 60 धावा केल्या. गार्डनर ही एकमात्र कोरोनाची लागण झालेली ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या एका निवेदनात ( Statement of Cricket Australia ) सांगितले की, बाकी सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. न्यूझीलंडमध्ये कोविड महामारीच्या दरम्यान विश्वचषक शुक्रवारपासून सुरू होणार आहे. न्यूझीलंडमध्ये कोविड-19 च्या दैनंदिन रुग्णांची संख्या या आठवड्यात 22,000 पेक्षा जास्त आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details