महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Womens World Cup 2022: टीम इंडियाच्या पराभवानंतर मिताली राजचं निवृत्तीवर महत्वाचे वक्तव्य; जाणून घ्या काय म्हणाली - महिला क्रिकेट संघाच्या बातम्या

आयसीसी महिला विश्वचषक 2022 च्या शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागल्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाला. यानंतर निवृत्तीसह इतर प्रश्नांना उत्तर देताना कर्णधार मिताली राजने ( captain Mithali Raj ) काही महत्वाची वक्तव्य केली आहेत.

Mithali Raj
Mithali Raj

By

Published : Mar 28, 2022, 5:05 PM IST

Updated : Mar 28, 2022, 7:32 PM IST

क्राइस्टचर्च:भारताची कर्णधार मिताली राजने ( Indian captain Mithali Raj ) रविवारी मान्य केले की, उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या ( Womens World Cup 2022 ) अत्यावश्यक सामन्यात, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आपल्या डावाच्या शेवटच्या दहा षटकांत 51 पेक्षा जास्त धावा करू शकतो. तसेच ती म्हणाली की, आम्ही आणखी काही धावा जोडू शकलो असतो. पण शबनीम इस्माईलच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी शेवटच्या दहा षटकांत भारताचा धावसंख्या कमी केली. जिथे त्यांनी चार विकेट गमावल्या आणि त्यांना धावा करण्यापासून वंचित ठेवले.

आयएएनएसच्या प्रश्नाला उत्तर देताना मिताली म्हणाली, ''जेव्हा आम्ही फलंदाजी केली, तेव्हा आम्ही डेथ ओव्हर्समध्ये अधिक धावा जोडू शकलो असतो. इस्माईलने ( Bowler Shabnim Ismail ) शेवटच्या पाच षटकांमध्ये शानदार गोलंदाजी केली, परंतु आम्ही ज्या प्रकारची सुरुवात केली आणि आम्ही ज्या पद्धतीने डाव उभारला, त्यामुळं आम्ही विकेट्स घेऊन आणि अजून धावा करू शकलो असतो.''

275 धावांचे लक्ष्य असताना दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लॉरा वोल्वार्टने ( Opener Laura Wolwart ) सर्वाधिक 80 धावा केल्या आणि लारा गुडॉल (49) सोबत 125 धावांची भागीदारी केली. पण भारताने दोघींनाही बाद केले. पण मिग्नॉन डू प्रीझने शानदार फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. मिताली म्हणाली की, अष्टपैलू क्लो ट्रायॉनने केवळ नऊ चेंडूत १७ धावा केल्याने सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने वळवला. कारण तिने 47व्या षटकांत राजेश्वरी गायकवाडच्या चेंडूवर तीन चौकार मारले.

हॅगले ओव्हलवर रोमहर्षक सामना खेळल्यानंतर तिच्या भावनांबद्दल मितालीला विचारले असता, मिताली म्हणाली, “प्रामाणिकपणे सांगायचे तर माझ्याकडे सध्या बोलण्यासाठी काहीही नाही. मी फक्त सामना कसा राहिला आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

मिताली राजने विश्वचषकापूर्वी निवृत्ती घेण्याचे संकेत ( Signs of Mithali Raj retirement ) दिले होते. मात्र विश्वचषक उपांत्य फेरीच्या शर्यतीत रविवारी दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानंतर भविष्याबाबत निर्णय घेण्याची ही योग्य वेळ नसल्याचे ती म्हणाली. सहा विश्वचषक खेळलेल्या एकमेव महिला क्रिकेटपटूने सांगितले की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा शेवटचा साखळी सामना तीन विकेट्सने गमावल्याच्या निराशेतून ती बाहेर पडू शकली नाही.

निवृत्तीबद्दल विचारले असता ती म्हणाली ( Mithali Raj on retirement ), ''आज काय झाले हे समजून घेण्यासाठी आणि माझ्या भविष्याचा विचार करण्यासाठी तुम्ही मला एक तासही दिला नाही. जेव्हा तुम्ही एका वर्षाहून अधिक काळ सतत मेहनत घेऊन विश्वचषकाची तयारी करता आणि तुमची मोहीम अशीच संपते तेव्हा खूप निराशा येते. ते स्वीकारून तिथून पुढे जाण्यासाठी वेळ लागतो. कोणत्याही खेळाडूचे भविष्य काहीही असो, मी माझ्या भविष्याचा विचार केलेला नाही.''

हेही वाचा -IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात शानदार कामगिरीसाठी अफगाणिस्तानचे 'हे' सहा धुरंधर सज्ज

Last Updated : Mar 28, 2022, 7:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details