महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Womens World Cup 2022: गुणतालिकेत मोठे फेरबदल; उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान - महिला विश्वचषकाच्या लेटेस्ट बातम्या

महिला विश्वचषक स्पर्धेत ( Womens World Cup ) ऑस्ट्रेलिया पाठोपाठ आता दक्षिण आफ्रिकेनेही आपले उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले आहे. अशा स्थितीत आता भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी पुढील सामना जिंकावाचं लागेल. तसेच सध्या गुणतालिकेची स्थिती काय आहे, ते जाणून घेण्यासाठी त्यावर एक नजर टाकूया.

World Cup
World Cup

By

Published : Mar 24, 2022, 7:43 PM IST

हैदराबाद:आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक ( ICC Women's ODI World Cup ) स्पर्धेचे गुरुवार पर्यंत साखळी फेरीतील 24 सामने पार पडले आहेत. अजून साखळी फेरीतील 4 सामने बाकी आहेत. ज्यानंतर सेमीफायनल सामन्यांसाठी तिसरा आणि चौथा संघ कोण असणार आहे, हे चित्र स्पष्ट होईल. या अगोदर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाने आपली जागा सेमीफायनल सामन्यांसाठी निश्चित केली आहे. तसेच पाकिस्तानचा संघ स्पर्धतून बाहेर पडला आहे. त्यामुळे गुणतालिकेत देखील काही बदल झाले आहेत.

गुणतालिकेत झालेले बदल -ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ ( Australian women's cricket team ) सर्व सहा सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने सहापैकी चार सामने जिंकले, तर एक सामना अनिर्णित राहिला. हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजने आपले सर्व सात सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन सामने जिंकून वेस्ट इंडिज संघ सात गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, इंग्लंड आणि भारत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. या तिन्ही संघांनी 3-3 सामने जिंकले आहेत. मात्र, भारत आणि इंग्लंड संघाचा अजून 1-1 सामने बाकी आहेत.

सेमीफायनलपूर्वी भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान - बांगलादेशसारख्या कमकुवत संघाविरुद्ध इंग्लंडचा शेवटचा सामना 27 मार्च रोजी आहे. अशा स्थितीत इंग्लंडचा विजय जवळपास निश्चित आहे. अशावेळी दक्षिण आफ्रिकेला भारताने हरवल्यास तो उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. जर यामध्ये भारत हरला तर वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत पोहोचेल. म्हणजेच भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी एकच संधी आहे. ज्यामुळे त्यांना दक्षिण आफ्रिकेला कोणत्याही परिस्थितीत हरवावे लागेल. भारताचा पुढील सामनाही 27 मार्चला होणार आहे. ज्यामध्ये भारतासमोर दक्षिण आफ्रिका संघाचे कडवे आव्हान असणार आहे. कारण दक्षिण आफ्रिका संघ ( South Africa team ) या स्पर्धेत फक्त एक सामना हरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details