पुणे:महिला टी-20 चॅलेंज 2022 ( Womens T20 Challenge 2022 ) मधील तिसरा सामना पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना व्हेलॉसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स ( Velocity vs Trailblazers ) संघात खेळला जाईल. या सामन्याची नाणेफेक दोन्ही संघाचे कर्णधार दीप्ती शर्मा आणि स्मृती मंधाना यांच्यात पार पडली आहे. व्हेलॉसिटीची कर्णधार दीप्ती शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना संध्याकाळी ठीक साडेसातला सुरु होणार आहे.
ट्रेलब्लेझर्स संघाला या आधी आपला पहिला सामना सुपरनोव्हाज संघाविरुद्ध खेळला होता. ज्या सामन्यात ट्रेलब्लेझर्स संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर व्हेलॉसिटी संघाने आपल्या पहिल्या सामन्यात सुपरनोव्हाज संघाला पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे आजचा हा सामना दोन्ही संघाचा दुसरा सामना आहे. ट्रेलब्लेझर्स संघाला आजच्या सामन्यात आपल्या पहिल्या विजयाची नोंद करण्याची अपेक्षा असणार आहे.