पुणे:कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षी महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचे आयोजन झाले नव्हते. परंतु यावर्षी स्पर्धेते आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामातील पहिला सामना ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोव्हा ( Trailblazers vs Supernovas ) यांच्यात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला पुण्यातील एमसीए क्रिकेट मैदानावर सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी दोन्ही संघाचे कर्णधार स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांच्यात नाणेफेक पार पडली आहे. नाणेफेक जिंकून सुपरनोव्हाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
2020 मध्ये, सुपरनोव्हास अंतिम सामन्यात ट्रेलब्लेझर्सकडून पराभूत झाले. त्याचा बदला आज घेण्याचा हेतू सुपरनोव्हाचा असेल. कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षी ही स्पर्धा झाली नव्हती. यावर्षी पुन्हा त्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लीगमधील तिसरा संघ वेलोसिटी आहे. ट्रेलब्लेझर्समध्ये मंधाना व्यतिरिक्त जेमिमा रॉड्रिग्स आणि रिचा घोष सारख्या खेळाडू आहेत जे फलंदाजी मजबूत करतील. दुसरीकडे, सुपरनोव्हाच्या फलंदाजीची जबाबदारी कर्णधार हरमनप्रीत कौरवर ( Captain Harmanpreet Kaur ) असेल.