हैमिल्टन :आयसीसी महिला विश्वचषक ( Women World Cup ) स्पर्धेतील सोळावा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघात गुरुवारी सेड्डन पार्क येथे पार पडला. मारिजन कॅपच्या अष्टपैलू कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडवर दोन विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकातील चार सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडला पाच सामन्यांमध्ये हा तिसरा पराभव आहे.
दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडवर पहिला विजय -
महिला विश्वचषक स्पर्धेतील हा दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडवर हा पहिला विजय ( SA first win on NZ ) होता. ते आता आठ गुणांनी ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीत आहे. परंतु नेट रन रेटमुळे ते दुसऱ्या स्थानावर आहेत. शेवटच्या षटकांमध्ये चुरशीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका जिंकण्याची ही तिसरी वेळ होती. सलामीवीर लॉरा वोल्व्हर्ट (67) आणि कर्णधार स्युने लुस (51) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 47.5 षटकांत 228 धावांचे लक्ष्य पार केले. असे वाटत होते की, ते लक्ष्य गाठू शकणार नाहीत. पण नंतर तिसऱ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली.
लॉरा वोल्व्हर्ट आणि कर्णधार स्युने लुस ( Captain Sune Luce ) यांनी सामना जिंकण्याचा पाया रचला. त्यानंतर कॅप, जिने अष्टपैलू कामगिरी करताना दबावात इंग्लंड विरुद्ध शानदार पद्धतीने धावांचा पाठलाग केला होता. तिल पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेला जिंकवण्याचे काम दिले गेले.
तिने 35 चेंडूंचा सामना करताना 34 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 47 व्या षटकात तिच्या एका पाठोपाठ चार चौकारांचा समावेश होता. भागीदारी तुटल्यानंतर ही धावा करण्यासाठी स्वत:ला शांत ठेवले. फ्रँकी मॅकेला चौकार मारल्यानंतर आणि मिड-विकेटमधून एकल घेतल्यानंतर, अयाबोंगा खाकाने तीन चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.