क्राइस्टचर्च : आयसीसी महिला विश्वचषक ( ICC Women's World Cup ) स्पर्धेतील 28 वा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने तीन विकेट्सनने भारतावर विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचबरोबर भारतीय संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 274 धावा केल्या. या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 7 गडी गमावून 275 धावा करत सामना जिंकला.
भारत आयसीसी विश्वचषकातून बाहेर ( India out of ICC World Cup ) पडला आहे. दक्षिण आफ्रिकेने हाय व्होल्टेज सामन्यात मिताली राजच्या संघाचा 3 गडी राखून पराभव करून त्यांना स्पर्धेतून बाहेर केले. तत्पुर्वी सलामीवीर स्मृती मानधनाने 71, कर्णधार मिताली राजने 68, शेफालीने 53 धावा केल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना भारताने 274 धावा केल्या होत्या. त्यानंतर लॉरा वोल्वार्डने 80 आणि मायग्नॉन डु प्रीझच्या 52 धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष्य सहजतेने पार केले.