महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Women World Cup 2022 : भारताला पुन्हा एकदा खराब फलंदाजीचा फटका; इंग्लंडचा भारतावर 4 विकेट्सने विजय - भारतीय महिलाचा दुसरा पराभव

विश्वचषकात भारत आणि इंग्लंडचे महिला संघ आमनेसामने आले होते. ज्यामध्ये इंग्लंड संघाने भारताचा 4 विकेट्स राखून ( England Women won by 4 wkts ) पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा या स्पर्धेतील दुसरा पराभव झाला.

England
England

By

Published : Mar 16, 2022, 1:07 PM IST

बे ओवल (माउंट मौनगानुई ) :आयसीसी महिला विश्वचषक ( ICC Women's World Cup ) स्पर्धेतील पंधरावा सामना माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल येथे पार पडला. हा सामना इंग्लंड विरुद्ध भारत संघात खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारतावर 4 विकेट्सने विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 36.2 षटकांत 134 धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंड 135 धावांचे फक्त 6 विकेट्स गमावून 31.2 षटकांत 136 धावा करत पूर्ण केले.

भारतीय संघाची खराब फलंदाजी -

भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याची नाणेफेक इंग्लंडने जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. भारताचा अर्धा संघ फक्त 61 धावांवर इंग्लंडने 15 षटकांत तंबूत धाडला. भारताने केलेली ही फलंदाजी अतिशय लाजिरावणी होती. भारताकडून सर्वाधिक धावा स्मृती मंधानाने केल्या तिने आपल्या खेळीत 35 धावा ( Smriti Mandhana's 35 runs ) केल्या. त्याचबरोबर रिचा घोषने 33 धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारताला 100 धावांचा टप्पा पार करता आला. तसेच इतर सहा फलंदाजांना दुहेरी आकडा सुद्ध गाठता आला नाही. इंग्लंडकडून शानदार गोलंदाजी करताना शार्लोट डीनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या ( Charlotte Dean took 4 wickets ) आणि भारतीय फलंदाजीला भगदाड पाडले. त्यामुळे भारताचा डाव 134 धावांवर गुंडाळला.

इंगलंड संघ 135 धावांचा पाठलाग करायाला उतरला तेव्हा त्यांची सुरुवात देखील खराब झाली, त्यांनी 4 धावेववर 2 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर शानदार पुनरागमन करताना इंग्लंडने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. इंगलंडकडून सर्वाधिक धावा हेदर नाइटने ( Heather Knight scored the most runs ) केल्या. तिने 53 धावांची खेळी साकारली. तसेच सिव्हरने 45 धावांचे योगदान दिले. त्यामुळे इंग्लंडने हे सोपे आव्हान 31.2 षटकांत 6 बाद 136 धावा करत पूर्ण केले. भारताकडून मेघना सिंगने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details