हॅमिल्टन:आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला 4 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील तिसरा सामना सेड्डन पार्क येते खेळवण्यात आला. हा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडवर 12 धावांनी विजय मिळवला ( Australia Women won by 12 runs ). त्याचबरोबर या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 3 बाद 310 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून रॅचेल हेन्स 131 चेंडूंचा सामना करताना 14 चौकार आणि एक षटकारांच्या मदतीने 130 धावांची ( Rachel Hayne century ) खेळी केली. त्याचबरोबर मेग लॅनिंग 86 धावा आणि यष्टीरक्षक हेलीने 28 धावांचे योगदान दिले. तसेच मूनी आणि पेरी या दोघी अनुक्रमे 27 आणि 14 धावा करत नाबाद राहिले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने तीनशे धावांचा टप्पा पार केला. तसेच इंग्लंड संघाकडून गोलंदाजी करताना एन सायव्हरने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. के ब्रुंटने एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलिया संघाने लक्ष्य म्हणून दिलेल्या 311 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. इंग्लंडला पहिल्याच षटकात लॉरेन विनफील्ड-हिलच्या रुपाने पहिला धक्का बसला. परंतु त्यानंतर इंग्लंड संघाने आपला डाव सावरला. ज्यामध्ये टॅमी ब्यूमॉन्टने 74 धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर हेदर नाइट देखील 40 धावांचे योगदान दिले. परंतु नॅटली सायव्हरने ( Natalie Cyver century ) एकाकी झुंज देत 85 चेंडूत 109 धावांची नाबाद खेळी केली. मात्र तरी देखील इंग्लंडच्या इतर फलंदाजांनी खराब कामगिरी केल्याने इंग्लंड संघाला 8 बाद 298 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना जोनासेन आणि तहिला यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 12 धावांनी विजय मिळवला