इस्ट लंडन (द. आफ्रिका) : महिलांच्या तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात गुरुवारी भारताला यजमान दक्षिण आफ्रिकेकडून पाच गडी राखून पराभव पत्करावा लागला. क्लो ट्रायॉनने (३२ चेंडूत नाबाद ५७ धावा) केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 110 धावांचे अल्प लक्ष्य दोन षटके शिल्लक असताना गाठले. तिने तिच्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार ठोकले
इस्ट लंडनचीखेळपट्टी संथ : इस्ट लंडनच्या संथ खेळपट्टीवर दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा या भारतीय फिरकीपटूंनी आफ्रिकेला रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. एका वेळी दक्षिण आफ्रिकेची 47 धावांत 4 बाद अशी अवस्था झाली होती. त्यानंतर 14 व्या षटकाच्या सुरुवातीला त्यांची 5 बाद 66 अशी अवस्था असतानाही ट्रायॉनच्या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने विजय खेचून आणला. संथ धावपट्टीमुळे चेंडू अनेकदा बॅटवर येत नव्हता.
भारताची फलंदाजी ढेपाळली :पराभवानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, आमची फिटनेस ठीक आहे. विश्रांती घेतल्याने ती चांगली होईल. आमच्याकडून काही चांगली कामगिरी देखील झाली आहे. दुर्दैवाने आज आम्हाला हवी तशी फलंदाजी करता आली नाही. गोलंदाजांनी मात्र चांगली कामगिरी केली. तत्पूर्वी भारतीय संघाला 20 षटकांत चार गडी गमावूनही केवळ 109 धावा करता आल्या. देओलने 56 चेंडूत 46 धावांची संघ खेळी केली. स्टायलिश स्मृती मानधना शून्यावर बाद झाली तर कर्णधार हरमनप्रीत कौर (२१) देखील सेट होत असतानाच डग-आउटमध्ये परतली. देओलने मोठ्या संख्येने डॉट बॉल खेळले ज्यामुळे दीप्तीवर दबाव वाढला. दीप्ती शर्मा 14 चेंडूत 16 धावा काढून नाबाद राहिली.
आफ्रिकेच्या फिरकीपटूंची उत्तम कामगिरी : दक्षिण आफ्रिकेसाठी डावखुरी फिरकीपटू नॉनकुलुलेको म्लाबा (4 षटकात 2/16) आणि अनुभवी वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने (3 षटकात 0/9) पॉवरप्लेमध्ये चमकदार कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेच्या या जोडीने तब्बल 25 डॉट बॉल टाकले. पॉवरप्ले ओव्हर्समध्ये भारताने फक्त 19 धावा केल्या. रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत दोघींनाही म्लाबा आणि लेग-स्पिनर सुने लुयसने कीपर सिनालो जाफ्ता हिच्याकडून स्टंपिंगद्वारे बाद केले. भारताची दुर्दशा अशी होती की 20 षटकांत भारत चौकारांचा दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. भारताने फलंदाजांनी आपल्या इनिंग्समध्ये तब्बल 57 डॉट बॉल खेळले.
हेही वाचा : WPL 2023 : झुलन गोस्वामी यांची मुंबई फ्रँचायझीच्या गोलंदाज प्रशिक्षक पदी नियुक्ती