दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी महिलांची ताजी एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली ( ICC Announced Women ODI Rankings ) आहे. ज्यामध्ये भारताची अनुभवी फलंदाज मिताली राज आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत सातव्या आणि स्मृती मंधाना ( Opener Smriti Manadhana ) नवव्या स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची अॅलिसा हिली अव्वल स्थानावर असून, त्यापाठोपाठ इंग्लंडची नताली स्कायव्हर आहे. न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत दोघींनी चमकदार कामगिरी केली होती.
गोलंदाजांच्या यादीत भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ( Veteran fast bowler Jhulan Goswami ) पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तानची सलामीवीर सिद्रा अमीनने फलंदाजांच्या क्रमवारीत 19व्या स्थानांची झेप घेत 35वे स्थान पटकावले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत तिने 218 धावा केल्या होत्या. श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टू ( Captain Chamari Atapattu ) सहा स्थानांनी आघाडी घेत 23व्या स्थानावर पोहोचली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिने शतक झळकावले होते. गोलंदाजांमध्ये इंग्लंडची सोफी एक्लेटन अव्वल, तर दक्षिण आफ्रिकेची शबनम इस्माईल दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाची जेस जोनासेन तिसऱ्या स्थानावर आहे.