महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

WI vs SA : दक्षिण अफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर २५ धावांनी विजय, मालिका ३-२ ने जिंकली

दक्षिण आफ्रिका संघाने पाचव्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघाचा २५ धावांनी पराभव केला आणि मालिका ३-२ ने जिंकली.

http://10.10.50.85:6060///finalout4/maharashtra-nle/finalout/04-July-2021/12353683_kkk.jpg
http://10.10.50.85:6060///finalout4/maharashtra-nle/finalout/04-July-2021/12353683_kkk.jpg

By

Published : Jul 4, 2021, 5:32 PM IST

ग्रेनाडा - दक्षिण आफ्रिका संघाने पाचव्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघाचा २५ धावांनी पराभव केला. एडेन मार्करम याने ७० धावांची खेळी करत आफ्रिकेच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. या विजयासह आफ्रिकेने पाच सामन्याची मालिका ३-२ ने जिंकली. दरम्यान, याआधी उभय संघात दोन कसोटी सामन्याची मालिका पार पडली. यात आफ्रिकेच्या संघाने २-०ने विजय मिळवला आहे.

सेंट जॉर्जच्या ग्रेनाडा येथे पार पडलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आफ्रिकेची सुरूवात खराब झाली. त्याची पहिली विकेट शून्यावर झाली. कर्णधार टेम्बा बवूमा शून्यावर बाद झाला. तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरलेल्या एडेन मार्करन याने क्विंटन डी कॉकच्यासोबत डावाला आकार दिला.

दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी १२८ धावांची भागिदारी केली. डी कॉक ६० धावांवर बाद झाला. तर मार्करमने ७० धावांची खेळी साकारली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने २० षटकात ४ बाद १६८ धावा केल्या. वेस्ट इंडीजकडून फिडेल एडवर्डसने सर्वाधिक २ गडी बाद केले.

दक्षिण आफ्रिकेच्या १६९ धावांचा पाठलाग करताना यजमान संघाची देखील सुरूवात खराब झाली. संघाची धावसंख्या २० असताना लेंडल सिमन्स (३) बाद झाला. त्यानंतर एविन लुईसने एक बाजू लावून धरली. पण अनुभवी फलंदाज ख्रिस गेल मोठी खेळी करू शकला नाही. तो ११ धावांवर बाद झाला. लुईसने ५२ धावांची खेळी केली. पण त्यानंतर शिमरोन हेटमायर वगळता विंडीजच्या अन्य फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले.

केरॉन पोलार्ड (१३), आंद्रे रसेल (०), निकोलस पूरन (२०), ड्वने ब्रोव्हो (१) आणि अकील हुसेन (२) ठराविक अंतराने बाद झाले. परिणामी विंडीजच्या संघाला २० षटकात ९ बाद १४३ धावांपर्यंत मजल मारता आली. आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर विआन मुल्डर याने २ गडी बाद केले. ७० धावांची खेळी करणारा मार्करम सामनावीर तर तबरेज शम्सी मालिकावीर ठरला.

हेही वाचा -मिताली राजने रचला इतिहास, एकाच दिवसात तोडले २ विश्वविक्रम

हेही वाचा -IND vs SL : राहुल द्रविडच्या तालमीत टीम इंडियाने गिरवले क्रिकेटचे धडे, पाहा व्हिडिओ

For All Latest Updates

TAGGED:

south africa

ABOUT THE AUTHOR

...view details